रावणवाडी
रावणवाडी हे स्थळ भंडारा तालुक्यात मुख्यालयापासून २० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणी सुमारे १०० वर्षांपासून मौजा रावणवाडी येथील पहाडीवर श्री राम मंदीर आहे. मंदिराच्या दक्षिणेस हनुमान मंदीर आणि पश्चिमेस अंबामाईचे मंदीर आहे. पायथ्याशी रावणवाडी जलाशय आहे ज्यात वर्षभर पाणी असते. कार्तिक एकादशी अमावास्येला यात्रा भरते.